Translate

Saturday, August 5, 2017

दादर चैपाटिवर शाळकरि मुलांचा म्रुत्यु

मुंबई, दि. 5 - दादर चौपटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही तिघंही मुलं धारावी परिसरातील राहणारी होती.  दरम्यान, बचाव पथकाच्या हाती दोन मुलांचा मृतदेह लागला तर एका मुलाचा भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, या शाळकरी मुलांचे मृतदेह   माहिम खाडी परिसरात सापडल्याची माहिती समोर आली आहे.हनुमंत, अनुप यादव आणि रोहित यादव अशी या मुलांची नावे आहेत. हे तिघंही जण दादरमधील वूलन मिल म्युन्सिपल शाळेतील विद्यार्थी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हनुमंत पाण्यात उतरला व यानंतर तो पाण्यात बुडू लागला. हनुमंतला वाचवण्यासाठी अनुप व रोहित पाण्यात उतरले. मात्र ते दोघंही बुडाले.